Saturday, December 27, 2008

दिवस असे की कोणी माझा नाही

"दिवस असे की कोणी माझा नाही" हे संदिप खरेचे गाणे लागलेले होते. त्यावर अरुशीची टिपण्णी...

"हा असं काय वेड्यासारखं म्हणतोय कोणी नाही म्हणून? कोणीतरी अहे असं छान छान म्हणावं हे याला माहित नाही का?"

का का कशामुळे?

अरुशी नेहमीप्रमाणे आजही भलत्याच फॉर्मात होती. आईला प्रश्न विचारुन भांडावून सोडने हा तिचा आवडता खेळ.

आई - तुझी हे सारखं सारखं "का? का? क??" ऐकून डोकं किट्ट झालं आहे. आता पुन्हा म्हणून मला "हे का, ते का" असं विचारु नकोस.
अरुशी (निरागस पणे वा चालूगिरी हे तिचे तिलाच माहित) - ठिक आहे. पण "कशामुळे"?

Tuesday, December 23, 2008

"ये बच्चू"वर अरुशीचे नृत्य

आज पहिल्यांदाच गजनी चित्रपटातले हे गाणे बघता-बघता अरुशीने त्याचा ठेका धरला.



Click here for this video on youtube

केव्हा तरी पहाटे... अरुषीचे गाणे

पूर्वी कधितरी ऐकलेले गाणे चालीसह लक्षात ठेऊन गायले आहे...

Friday, December 19, 2008

श्री. गुरुजींची सुटका

पार्श्वभूमी -एक पुस्तक चाळ्ताना श्री. गोळवलकर गुरूजींचे तुरूंगातील चीत्र निदर्शनास आले. तशी आरु आईला म्हणते,

अरूषी: आई, गुरुजी ईथे तुरूंगात आहेत ,बरोबर?
आई: हं
अरुशी: आता त्यांना बाहेर काढून दाखवू?
आई: दाखव
अरुशी: (भिंती वरील गुरू़जींच्या प्रतिमेकडे बोट दाखवत) ते बघ, तिथे!