Saturday, April 11, 2009

आळशी जिजस क्राइस्ट

अरु: बाबा, ख्रिश्चन लोकांच्या जय बप्पाचं नाव काय काय हो? विसरलेच मी.
मी : जिजस ख्राईस्ट
अरु : जसे आपले जय बप्पा सगळ्यां लोकांची, प्राण्यांची काळजी घेतात, आपल्याला पाणि, हवा, ऊन, अन्न हे सगळं मिळवण्यासाठी मदत करतात. तसं हा यांचा जय बप्पा काय करतो?
मी : बाळा जय बप्पा सर्वांचा एकच असतो. तो आपल्या हिंदू लोकांना भेटायला आला तेव्हा राम, कृष्ण, देवी अशा रुपांमध्ये भेटायला आला. या ख्रिश्चन लोकांना तो जिजस बनून भेटायला आला.
अरु : मग आपल्या राम-कृष्ण बप्पांनी दुष्ट राक्षसांना मारलं तसं या जिजसने कोणत्या राक्षसांना मारलं?
मी : नाही बाळा, तो राक्षसांना नाही मारु शकला.
अरु : ओह, म्हणजे तो आळशी होता होय. आता समजलं मला.

Monday, April 6, 2009

वसंतची फसवी चाहूल

आक्टोपासून सुरु असलेल्या हिवाळ्याने मार्चच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात जरा उसंत दिली. आम्ही तर वसंत ऋतू आला म्हणून आनंदी होऊन सायकल खेळायला बागेत मोर्चा सुद्धा वळवला. पण कसचे काय? बागेत उघड्या मैदानात गेल्यावर जाणवले की घराबाहेर आल्यावर गुलाबी वाटणारी थंडी अजूनही बोचरीच आहे.



या तळ्यावर आता उरल्या सुरल्या बर्फाचा थर राहिला आहे. त्याच्यावर पक्षी बसलेत. चित्र मस्त वाटते आहे ना?

वाट चुकलेला मासा



बाबा: बाळा, अगं हा मासा एकटाच का काढलास?
अरुशी : बाबा, तो वाट चुकलाय.