Saturday, April 12, 2008

My math - गणिताचा श्रीगणेशा !




मला आता पाढे येतात व छोट्या-छोट्या बेरजा वजाबाक्या पण येतात.

I know tables and can do small additions and substractions now...

Sunday, April 6, 2008

Big Sister Class



Today I attended big sister class... I am excited to be big sister!!

It's great feeling.

Thursday, February 28, 2008

Arushi in airplane cockpit

It was her ninth air travel and seventeenth plane she was boarding just after her fourth birthday celebration when my Arushi was invited to visit the cockpit of the plane and meet the pilots. While boarding the flight, as usual, she was excited and confident. She wanted to see how the plane looked like and was greeting all the officials on the way. After entering the plane, greetings were exchanged with the attendant and the attendant was flat with the cheerful smile and cute hello from my princess. But it was not Arushi who would just head towards the seats. Without giving any trouble to dad, she was trying to see and watch as much as she can when she peeped inside the cockpit from far. And this was the moment when she was invited to say hello to the captain. That's it; she was going to miss that chance. And after that visit, she came back and asked dad, "babaa, tumhi lahaan asataana tumhaalaa pan vimaachya driver ne bhetaayala bolawale hote kaa?"... so innocent!

Just for records....

Travel No. Details Planes boarded
1. Mumbai - Chicago via London - 2
2. Chicago - Hartford - 3
3. New York - Mumbai - 2
4. Mumbai - New York - 2
5. Hartford - Dallas - 1
6. Dallas - Hartford - 2
7. New York - Mumbai - 2
8. Mumbai - New York - 2
9. Hartford - Houston - 2

Total # of Planes boarded till now = 18

Mom has just two more number of travels and dad three! ...... Hope my little sweet heart owns a plane one day!

Wednesday, January 16, 2008

उंदिर "वाजवी" कसे?

अरुशीची गाण्यांची आपली इस्टाईल हाये (तिचा शब्द). "आपून बोला", "इक्स्क्यूज मी, क्या रे..." आणि "वन ओ क्लॉक, इन माय हाऊस, देअर वाज अ कॅट" अशी काही नशीबवान गाणीच दुसर्‍यांची असूनही आम्ही गातो. बाकी वेळेला आमची स्वताची गीतेच चालू असतात. त्यांचे बोल ज्या क्षणी तयार होतात त्याच क्षणापुरते असतात. हेच बघा ना... "आता भू-भू काय करणार, चिऊ तर उडाली... हत्ती गेला... आता काय करणार".

अत्ता एक गाणे चालले होते...
उंदिर मामा ढोल वाजवला,
उंदिर मामा ढोल वाजवला...

आम्हाला वाटले की हिला म्हणताच येत नाहीये. तिला म्हटले, "अगं बेटा, त्या गाण्यात "वाजवी" असं आहे".

त्यावर तिचे उत्तर, "अगं आई, उंदिर मुलगा असतो ना, मग तो वाजवी असं कसं म्हणायचं? वाजवला असच म्हणायला पाहिजे ना?"

Hats off!

Friday, January 4, 2008

जय बप्पाने सांगितले

अरुशीला बाबासारखे पाकिट हवे होते. ते आईने दिले. क्रेडिट कार्डची व्यवस्था कंपन्या/बँकांनी पाठवलेल्या ऑफर सोबतच्या नमुन्यांनी (samples) केली. सतत येत राहणार्‍या या ऑफर्सने तिच्याकडे एव्हाना डझनावर कार्डे जमली आहेत. निरनिराळ्या रंगांची ही कार्डे तिच्या खेळणपाण्यातला हवीभाज्य घटक आहेत. आज या कर्डांमुळे तिच्याशी झालेला एक गंमतीदार प्रसंग...

ती ते कार्डस खेळण्यात गुंग होती. उगी तिचे काय चालले आहे म्हणून तिला डिवचले...

बाबा : बाळा, मला दे ना तुझे एक रंगीत कार्ड.
अरूशी: कोणत्या रंगाचं पाहिजे?
बाबा : हम्म... मला किनई, ग्रीन कलरचे दे.
अरूशी: ते तर माझ्याकडे नाहीये.
बाबा : आगं असं काय करतेस. आहे ना त्यात.
अरूशी: आरे बाबा, त्याचा कलर ग्रीन नाहीये. त्यात दुसर्‍या रंगाचे शेड आहेत.
बाबा : बरं मग व्हाईट दे.
अरूशी: व्हाईट सुद्धा नाही. त्यात बघ यलो कलर आहे थोडा.
बाबा : बरं मग ब्लू दे.
अरूशी: हे बघ मी तुला ते दुरुन देते.
बाबा : नाही. मला हातात दे ना ते.
अरूशी: बाबा, तुझ्या या बाळाला कोणी बनवले आहे रे?
बाबा : जय बप्पाने.
अरूशी: मग त्या जय बप्पानेच मला सांगितलं आहे की हे कार्ड बाबाला देऊ नकोस म्हणून!

वा रे वा वकिली... आता काय बोलणार कप्पाळ!

Wednesday, November 21, 2007

द्विभाषी

दोन रात्री पोरिच्या दुखण्याने जागाव्या लागल्या होत्या. आजतरी सुखासुखी झोप लागून उद्या हापिसात जांभाळ्या द्यायची नामुष्की येऊ नये अन खुळखुळा झालेले शरीर पूर्ववत व्हावे म्हणून डोळे मिटले. तेवढ्यात आज बरी असलेली पण काल-परव १०३F च्या वर ताप असणा-या आमच्या कन्येने कानात वारे गेल्यासारख्या उड्या मारायला सुरु केल्या. तोंडाने बडबड सुरु होतीच. "all all water... big fish, small fish, tree," असे काही तरी चालले होते. "आता बंद करतेस का ..." असे म्हणणार तोच लक्षात आले की ती काही तरी सुसंबद्ध बोलते आहे. पण छे, कसे शक्त होते ते? आम्ही तर तिच्याशी चुकुनही इंग्रजी बोलत नाही. सहा आठवड्य़ात येवढे बोलायला शिकली ती शाळेत!

"all all water... big fish eating small fish and small fish eating bread.... a big tree and monkey sitting on it" तिचे हे चालू असतानाच तिला तोडून विचारले. "Arushi, do you know what your are saying?"

"मोठा मासा खूप-खूप पाण्यात पोहत असतो अन तो लहाण्या माशांना खातो. लहान मासे आपण टाकलेले ब्रेड खातात. पाण्याच्या बाजूला मोठे झाड असते", अगदी चोख उत्तर!

"so which means you know English well by now", आम्ही.

"yes, I know English".

"Now its enough of playing. Lets go to the bed. I have to go to the work tomorrow," तिला खरेच समजून बोलता येत आहे का हे पाहण्यासाठी खडा टाकून पाहिला.

"Its OK baba. I dont have school now, so I want to play," पुन्हा शटकार!

"which is my comforter and which one is yours?", पुन्हा तिची परिक्षा पाहण्याचा माझा प्रयत्न.

"baba, that big one is yours and this one with flawers is mine", आमच्या अपेक्षेला तडा देत ती चक्क इंग्रजी समजून बोलायला लागल्याचा साक्षात्कार झाला.

पुढे मग आमच्या बराच वेळ गप्प चालल्या. It was fun to see our little one speaking two languages so fluently. We were excited!

Thursday, November 8, 2007

पहिली शाळा - भाग १

(अरुशीच्या बाबाचे मनोगत)
मला तुम्ही शाळेत घालत नाही म्हणून तिची कुरकुर सहा महिन्यापासून सुरु झाली होती. शेजारच्या एका संस्थेत कौटुंबिक कार्यक्रमांना ती जायला लागली तेव्हापासून. तिला ते आवडे पण तिथे आठवड्यातून एकदाच जाणे होई. तशातच आमच्या चर्चा ऐकताना कधितरी तिला कळाले की दररोज जाता येण्यासारखी सुद्धा शाळा असते. त्यात तिला आमच्या इमारतीतल्या काही मैत्रिणी शाळेत जाता येताना भेटत होत्या. त्यांच्या पाठीवरच्या पिशव्या, हातातल्या पाण्याच्या डब्या तसेच नवनवीन वह्या-पुस्तके पाहून तिला कधी येकदा शाळेत जाते असे झाले होते. त्यावरून एक-दोन दिवसांत एखादे भोकाड पसरणे चालू असे.

आमचा सुद्धा शाळा शोध सुरु झाला. काहीचा महिती नव्हती. या वयाच्या मुलांना कसल्या प्रोग्राम मध्ये टाकायचे असते हे सुद्धा माहित नव्हते. मग अनुभवी पालकांकडून माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यांच्या पाल्यांच्या शाळेत फोन केले. तेव्हा समजले की २११ क्रमांकावर या विषयासाठी चकटफू मार्गदर्शन मिळते. मार्गदर्शन तसेच अजूबाजूच्या शाळांचे क्रमांक मिळाले. हिला school readiness program असणा-या pre-school मध्ये भरती करावे असे सांगण्यात आले. तसेच जर कमी खर्चात पाहिजे असेल तर शासकीय अनुदान घेत असलेल्या संस्थांमध्ये जावे असा सल्ला सुद्धा मिळाला.

आम्हाला सुद्धा आता हिला शाळेत घालायचेच होते. मराठी उत्तम बोलता येते, सांगितलेले खूप चांगले ऐकते हे सगळे खरे असले तरी इंग्रजीत आमची बोंबाबोंब होती. अर्था आम्ही जाणून बुजून तिला बळेच आमच्या मित्रांच्या मुलांप्रमाणे इंग्रजी ऐवजी मिंग्रजी शिकवले नव्हते. काही जाणकारांच्या सल्ल्यानुसार तिला पहिल्या २-४ वर्षांत केवळ मातृभाषा उत्तम शिकवण्यावर आम्ही भर दिला होता. तेव्हा शाळेत जाऊन तिने इंग्रजी शिकावे, तसेच इथल्या मुलांप्रमाणे इथल्या चालीरिती (दैनंदिन जीवनातल्या बाबी) शिकाव्यात अशी आमची अपेक्षा होती.

आमच्या घराच्या एक-दीड मैलात एवढ्या जास्त शाळा आहेत हे त्यांना भेट दिल्यावरच कळत होते. सप्टेंबर उजाडलेला असल्याने सगळ्या चांगल्या शाळा भरलेल्या होत्या. जेथे रिकाम्या जागा होत्या तेथे अरुशीने इंग्रजी ऐवजी सिंग्रजी शिकावी असे मला वाटत नव्हते. हिला मात्र ज्या शाळेत जावे तेथे लगेच थांबायचे होते. शेवटी घराजवळ असणारी, चांगली वाटणारी शाळा सापडली. फी जरा जास्तच होती. खिशाला जवळपास घरभाड्य़ा येवढेच दुसरे भोक पडणार होते. पण त्याशिवाय पर्याय दिसत नव्हता.

शाळेच्या पहिल्या भेटीसाठी सगळी कागदपत्रे तसेच अरुशीला सोबत घेऊन आमची स्वारी ठरलेल्या वेळात पोचली. शाळेचे वातावरण चांगले होते. बाहेरच्या आंगणात लावलेल्या घसरगुंड्य़ा वगैरेवर बाईसाहेबांचा क्षणात हल्लाबोल झाला होता. कुठे गेल्यावर दबकून राहण्याचा आमच्या पिढीचा स्वभाव आमच्या पोरीत अजिबात नसल्याने कोणाकडे लक्ष न देता "हेSSS, बाबाSSS" असे म्हणत आमची स्वारी घसरगुंडीवरून घसरत खाली पोचतच होती. तितक्यात तेथे उपस्थित असणा-या मास्तरणींतल्या एकीने पुढे येऊन मला सांगितले की ती घसरगुंडी केवळ मोठ्या मुलांसाठी आहे तेव्हा तुमच्या मुलीला तेथे खेळू देणे योग्य नाही. आणि तिकडे मात्र ही घसरगुंडीवर उलट दिशेने चढत होती. ते पाहून तिथले गोरी अन काळी बालके मात्र आश्चर्यचकित झाली होती.

प्रवेशाची formalities पार झाल्या. अरुशीला शाळा भारी आवडली होती. तिच्या दॄष्टिकोणातून पहायचे झाल्यास येथे केवळ खेळायला मिळणार, खूप सारे संवगडी असणार अन आई-बाबांचा घाक नसणार अशी तिची अपेक्षा मला कळून चुकली होती.

शाळेसाठी काय काय विकत आणायचे याची यादी घेऊन तसेच शाळेत आणून सोडण्याचे, घेऊन जाण्याचे वगैरे नियम समजाऊन घेऊन आम्ही बाहेर पडलो. जयाने एकदा शाळा पाहिली अन पहिला चेक दिला की पुढच्या सोमवारी शाळा सुरु होणार होती.

(क्रमश:)