Wednesday, November 21, 2007

द्विभाषी

दोन रात्री पोरिच्या दुखण्याने जागाव्या लागल्या होत्या. आजतरी सुखासुखी झोप लागून उद्या हापिसात जांभाळ्या द्यायची नामुष्की येऊ नये अन खुळखुळा झालेले शरीर पूर्ववत व्हावे म्हणून डोळे मिटले. तेवढ्यात आज बरी असलेली पण काल-परव १०३F च्या वर ताप असणा-या आमच्या कन्येने कानात वारे गेल्यासारख्या उड्या मारायला सुरु केल्या. तोंडाने बडबड सुरु होतीच. "all all water... big fish, small fish, tree," असे काही तरी चालले होते. "आता बंद करतेस का ..." असे म्हणणार तोच लक्षात आले की ती काही तरी सुसंबद्ध बोलते आहे. पण छे, कसे शक्त होते ते? आम्ही तर तिच्याशी चुकुनही इंग्रजी बोलत नाही. सहा आठवड्य़ात येवढे बोलायला शिकली ती शाळेत!

"all all water... big fish eating small fish and small fish eating bread.... a big tree and monkey sitting on it" तिचे हे चालू असतानाच तिला तोडून विचारले. "Arushi, do you know what your are saying?"

"मोठा मासा खूप-खूप पाण्यात पोहत असतो अन तो लहाण्या माशांना खातो. लहान मासे आपण टाकलेले ब्रेड खातात. पाण्याच्या बाजूला मोठे झाड असते", अगदी चोख उत्तर!

"so which means you know English well by now", आम्ही.

"yes, I know English".

"Now its enough of playing. Lets go to the bed. I have to go to the work tomorrow," तिला खरेच समजून बोलता येत आहे का हे पाहण्यासाठी खडा टाकून पाहिला.

"Its OK baba. I dont have school now, so I want to play," पुन्हा शटकार!

"which is my comforter and which one is yours?", पुन्हा तिची परिक्षा पाहण्याचा माझा प्रयत्न.

"baba, that big one is yours and this one with flawers is mine", आमच्या अपेक्षेला तडा देत ती चक्क इंग्रजी समजून बोलायला लागल्याचा साक्षात्कार झाला.

पुढे मग आमच्या बराच वेळ गप्प चालल्या. It was fun to see our little one speaking two languages so fluently. We were excited!

No comments: