अरुशीची गाण्यांची आपली इस्टाईल हाये (तिचा शब्द). "आपून बोला", "इक्स्क्यूज मी, क्या रे..." आणि "वन ओ क्लॉक, इन माय हाऊस, देअर वाज अ कॅट" अशी काही नशीबवान गाणीच दुसर्यांची असूनही आम्ही गातो. बाकी वेळेला आमची स्वताची गीतेच चालू असतात. त्यांचे बोल ज्या क्षणी तयार होतात त्याच क्षणापुरते असतात. हेच बघा ना... "आता भू-भू काय करणार, चिऊ तर उडाली... हत्ती गेला... आता काय करणार".
अत्ता एक गाणे चालले होते...
उंदिर मामा ढोल वाजवला,
उंदिर मामा ढोल वाजवला...
आम्हाला वाटले की हिला म्हणताच येत नाहीये. तिला म्हटले, "अगं बेटा, त्या गाण्यात "वाजवी" असं आहे".
त्यावर तिचे उत्तर, "अगं आई, उंदिर मुलगा असतो ना, मग तो वाजवी असं कसं म्हणायचं? वाजवला असच म्हणायला पाहिजे ना?"
Hats off!
Wednesday, January 16, 2008
Friday, January 4, 2008
जय बप्पाने सांगितले
अरुशीला बाबासारखे पाकिट हवे होते. ते आईने दिले. क्रेडिट कार्डची व्यवस्था कंपन्या/बँकांनी पाठवलेल्या ऑफर सोबतच्या नमुन्यांनी (samples) केली. सतत येत राहणार्या या ऑफर्सने तिच्याकडे एव्हाना डझनावर कार्डे जमली आहेत. निरनिराळ्या रंगांची ही कार्डे तिच्या खेळणपाण्यातला हवीभाज्य घटक आहेत. आज या कर्डांमुळे तिच्याशी झालेला एक गंमतीदार प्रसंग...
ती ते कार्डस खेळण्यात गुंग होती. उगी तिचे काय चालले आहे म्हणून तिला डिवचले...
बाबा : बाळा, मला दे ना तुझे एक रंगीत कार्ड.
अरूशी: कोणत्या रंगाचं पाहिजे?
बाबा : हम्म... मला किनई, ग्रीन कलरचे दे.
अरूशी: ते तर माझ्याकडे नाहीये.
बाबा : आगं असं काय करतेस. आहे ना त्यात.
अरूशी: आरे बाबा, त्याचा कलर ग्रीन नाहीये. त्यात दुसर्या रंगाचे शेड आहेत.
बाबा : बरं मग व्हाईट दे.
अरूशी: व्हाईट सुद्धा नाही. त्यात बघ यलो कलर आहे थोडा.
बाबा : बरं मग ब्लू दे.
अरूशी: हे बघ मी तुला ते दुरुन देते.
बाबा : नाही. मला हातात दे ना ते.
अरूशी: बाबा, तुझ्या या बाळाला कोणी बनवले आहे रे?
बाबा : जय बप्पाने.
अरूशी: मग त्या जय बप्पानेच मला सांगितलं आहे की हे कार्ड बाबाला देऊ नकोस म्हणून!
वा रे वा वकिली... आता काय बोलणार कप्पाळ!

Subscribe to:
Posts (Atom)