अरुशीची गाण्यांची आपली इस्टाईल हाये (तिचा शब्द). "आपून बोला", "इक्स्क्यूज मी, क्या रे..." आणि "वन ओ क्लॉक, इन माय हाऊस, देअर वाज अ कॅट" अशी काही नशीबवान गाणीच दुसर्यांची असूनही आम्ही गातो. बाकी वेळेला आमची स्वताची गीतेच चालू असतात. त्यांचे बोल ज्या क्षणी तयार होतात त्याच क्षणापुरते असतात. हेच बघा ना... "आता भू-भू काय करणार, चिऊ तर उडाली... हत्ती गेला... आता काय करणार".
अत्ता एक गाणे चालले होते...
उंदिर मामा ढोल वाजवला,
उंदिर मामा ढोल वाजवला...
आम्हाला वाटले की हिला म्हणताच येत नाहीये. तिला म्हटले, "अगं बेटा, त्या गाण्यात "वाजवी" असं आहे".
त्यावर तिचे उत्तर, "अगं आई, उंदिर मुलगा असतो ना, मग तो वाजवी असं कसं म्हणायचं? वाजवला असच म्हणायला पाहिजे ना?"
Hats off!
Wednesday, January 16, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment