Wednesday, October 31, 2007

आईची आठवण

आज अरुशीला शाळेत आणताना कारमध्ये घडलेली घटना. आम्ही शाळेच्या वाहन तळातून अरुंद पण रहादारीच्या रस्त्यावर आलेलो होतो. बाजूने वाहने जात-येत होती तसेच काही लोक पदपथावर पण चालत होते. तितक्यात अरुशीने मला विचारले, "बाबा, तिला तिच्या आईची का आठवण येतेय?". "कोणाला गं?", मी विचारले. "तिलाच हो." मी आजूबाजूला रस्त्यांवर वा बाजूच्या वाहनांमध्ये कोणी आहे का पाहात होतो. तितक्यात मझी ट्यूबलाईट पेटली. आमच्या गाडीत "मेरे ख्वाबों में जो आये" हे गाणे चालले होते. मी असे जुने गाणे सहसा लावत नाही तेव्हा तिच्यासाठी ते नवीनच होते. मी विचारले, "या गाण्यातल्या आंटीला का?". "हो", तिचे निरागस उत्तर, "पण का येत आहे सांगा ना बाबा?". "तुला का येते तुझ्या आईची? तशीच तिला पण येते", आमच्या उत्तरावर स्वारीचे समाधान झाले होते.

No comments: