पार्श्वभूमी - मागच्या २-३ आठवड्यांपासून माझ्या पाठीत करक भरलेली होती.
आई: अगं अरुषी रंग सांडू देऊ नकोस ना. कार्पेट खराब झालं तर तुझे बाबा मला 'सू धर की आपट' करतील.
अरूषी: अगं बाबांच्या पाठीत तर क्रँप आलाय. मग ते कसे 'सूं धर की आपट' करू शकतील?
- - - - - - -
पार्श्वभूमी -फोनवर बोलता बोलता आई चिडून फोन मध्येच बंद करते.
अरूषी: आई, काय झालं? बाबा चिडून काय म्हणाले?
आई: काही नाही म्हणाले.
अरुषी: 'म्हशीचं शेण' म्हणाले का?
- - - - - - - -
पार्श्वभूमी -अशातच ज्ञानेश्वरांचा 'मुंगी उडाली आकाशी' हा चित्रपट पाहून झाला होता.
आई: तू माझा ज्ञाना आहेस ना? ज्ञानेश्वर असे कधीच चिडत नव्हते.
अरूषी: आई, ज्ञानेश्वर महाराजांचे आई बाबा सुद्धा त्यांच्यावर कधिच चिडत नव्हते.
- - - - - - - -
Wednesday, August 27, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment